Latest

महायुतीच्या विजयासाठी दत्त चरणी मुख्यमंत्री शिंदेंचे साकडे

Shambhuraj Pachindre

नृसिंहवाडी; पुढारी वृत्तसेवा; येथील दत्त मंदिरात लोकसभेच्या निवडणुक प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दत्त चरणी प्रार्थना करीत महायुतीच्या विजयासाठी साकडे घातले.

आज सायंकाळी (दि.4) जयसिंगपूर येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेपूर्वी सात वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दत्त मंदिराला भेट दिली. यावेळी दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी सचिव संजय पुजारी यांच्या हस्ते त्यांचा शाल आणि दत्त प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभारी सरपंच रमेश मोरे यांनी ही त्यांचा सत्कार केला. मुख्यमंत्री दत्त मंदिरात आल्यानंतर ब्रह्मवृंदांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली. यावेळी महायुतीच्या विजयासाठी प्रार्थना केली.

यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, , विश्वस्त संतोष खोंबारे संजय पुजारी पांडुरंग पुजारी, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील देवस्थानचे माजी अध्यक्ष विकास पुजारी प्रविण आणुजे, , मुकुंद पुजारी राजेंद्र ढवळे संजय गवंडी युवराज जगदाळे, संजय शिरटीकर प्रशांत गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT