पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरातील खवय्यांच्या पसंतीस उतरलेल्या चिकन टिक्का मसाला डिशचा शोध लावणारे शेफ अहमद अस्लम अली यांचे स्कॉटलंडमध्ये निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. ते ग्लासगो शहरातील शिश महल या रेस्टॉरंटचे मालक होते.
आज जगभर मासांहार करणांमध्ये चिकन टिक्का मसाला डिशचा लोकप्रिय आहे. मात्र या डिशचा कसा शोध लागला याची कहाणी रंजक आहे. याबाबत 'एएफपी'ला मुलाखत देताना अहमद अस्लम अली यांनी सांगितले होते की, "त्यांच्या शिश महल या रेस्टॉरंटमध्ये एक ग्राहक आला. त्याने चिकन डीशची ऑडर्र दिली. अली यांनी आपल्या पारंपरिक पद्धतीने ही डिश केली. मात्र ग्राहकाला ती कोरडी वाटली. त्याने सांगितले की ही डिश खूपच कोरडी आहे मी यामध्ये थोडे टोमॅटो सॉस घेईल. यानंतर अहमद अस्लम अली यांनी चिकनची नवीन डिश केली. यामध्ये त्यांनी दही, मलई आणि मसाले असलेल्या सॉस वापरुन चिकन टिक्का शिजवला. आणि चिकन टिक्का मसाला डिश तयार झाली."
अहमद अस्लम अली हे मुळचे पाकिस्तानचे. लहानपणीच ते आपल्या वडिलांसोबत इंग्लंडला गेले. त्यांचे कुटुंब तेथेच स्थानिक झाले. येथे त्यांनी १९६७ मध्ये आपले शिश महल हे रेस्टॉरंट सुरु केले. त्यांच्या पश्चात पाच मुले आहेत.
शेफ अहमद अस्लम अली यांनी ग्लासगो शहरातील शिश महल या रेस्टॉरंटचे मालक होते. त्यांनी जगप्रसिद्ध चिकन टिक्का मसाला डिशचा शोध लावला. त्यामुळे ग्लासगो शहराला चिकन टिक्का मसाल्याचे घर म्हणून ओळखले जावे, अशी मागणी खासदार मोहम्मद सरवर यांनी २००९ मध्ये केली होती. लोकप्रिय खाद्यपदार्यांपैकी एक चिकन टिक्का मसाला हा ब्रिटनचा राष्ट्रीय पदार्थ असल्याचेही म्हटले जाते.
हेही वाचा