छत्तीसगड, पुढारी ऑनलाईन: सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी आणि एक पुरुष नक्षलवादी ठार झाला. पोलिसांनी शस्त्रे, दारूगोळा आणि इतर नक्षल संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे. Chhattisgarh News छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील बासागुडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये बेलम गुट्टा टेकड्यांजवळ शोध मोहिमेदरम्यान आज (दि.२०) सकाळी ७.३० च्यादरम्यान ही चकमक झाली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विनोद कर्मा, राजू पुनेम, विश्वनाथ आणि गुड्डू तेलम यांच्यासह २०-२५ सशस्त्र नक्षलवाद्यांसह नक्षलवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर झारखंड पोलिस आणि कोब्रा युनिटने बेलम गुट्टा हिल्सजवळ संयुक्त शोध मोहीम सुरू केली. या शोध मोहिमेदरम्यान चकमक झाली.
हेही वाचा