वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ई-७२/१/२ सेक्टर मधील एनआरबी बेरिंग्स लिमिटेड कंपनीला आज (सोमवार) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी, मनपा तसेच गरवारे कंपनीच्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
हेही वाचा :