पुढारी ऑनलाइन डेस्क : Chattisgadh News : छत्तीसगढ येथे जवानांना नुकसान पोहोचवण्याचा नक्षलवाद्यांचा डाव हाणून पाडण्यात आला आहे. पोलिसांनी 5 किलोचे जिवंत IED जप्त करून ते यशस्वीरित्या नष्ट केले आहे. नारायणपूर पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी नेलानार एरिया कमिटीच्या नक्षलवाद्यांविरुद्ध कुकडझोर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, NH 130D मध्ये झडतीदरम्यान, जवानांनी रस्ता अडवण्यासाठी आणि जवानांना इजा करण्यासाठी नक्षलवाद्यांनी पेरलेला 5 किलो वजनाचा जिवंत IED जप्त केला. नारायणपूर येथील कुकडाझोर पीएस क्षेत्रांतर्गत ताडोनार रस्त्यावर डिमाईनिंगसाठी एक पथक पाठवण्यात आले. बीडीएस पथकाने घटनास्थळीच आयईडी नष्ट केले. याप्रकरणी नेलानार एरिया कमिटीच्या नक्षलवाद्यांविरुद्ध कुकडझोर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
– पीएस: हेमसागर सिदार, एएसपी नारायणपूर
हे ही वाचा :