Latest

Charles Sobhraj Released : बिकीनी किलर चार्ल्स शोभराजची नेपाळच्या जेलमधून सुटका; फ्रान्सकडे केले सुपूर्द

अमृता चौगुले

काठमांडू; पुढारी ऑनलाईन : नेपाळच्या सेंट्रल जेलमध्ये १९ वर्षांपासून कैदेत असलेला सीरियल किलर चार्ल्स शोभराज याची शुक्रवारी (दि.२२) नेपाळच्या सेंट्रल जेलमधून सुटका करण्यात आली. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे वृद्धत्व लक्षात घेऊन त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. चार्ल्स शोभराजचे फ्रान्सला प्रत्यार्पण करण्यात आले. (Charles Sobhraj Released)

विशेष म्हणजे, दोन अमेरिकन पर्यटकांच्या हत्येप्रकरणी शोभराज २००३ पासून नेपाळच्या तुरुंगात शिक्षा भोगत होता. सुप्रीम कोर्टाने बुधवारी तुरुंग व्यवस्थापन प्राधिकरणाला निर्देश दिले की, कुख्यात खुन्याची सुटका करावी आणि त्याची इतर कोणत्याही प्रकरणात गरज नसेल तर त्याला १५ दिवसांच्या आत इमिग्रेशनद्वारे फ्रान्सला पाठवावे. (Charles Sobhraj Released)

सूत्रांच्या माहितीनुसार, शोभराजला प्रथम दोहाला पाठवले जाईल आणि तेथून शुक्रवारी रात्री कतार एअरवेजच्या विमानाने पॅरिसला जाईल. सायंकाळी ६ वाजताच्या काठमांडू ते दोहा या विमानाने त्याला कतारला पाठविण्यात आले. फ्रान्समध्ये त्याला पाठविण्यात आल्यावर त्याला येथे पुन्हा येण्यास आजीवन बंदी घालण्यात आली आहे. मात्र, यापुर्वी चार्ल्सने दहा दिवस उपचारासाठी गंगालाल रुग्णालयात दाखल करण्याची विनंतीही त्यांने केल्याचे माहिती समोर आली आहे. २०१७ मध्ये त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली होती. (Charles Sobhraj Released)

चार्ल्स शोभराजची पत्नी निहिता बिस्वास यांनी सांगितले की, आज संध्याकाळी चार्ल्सला फ्रान्समध्ये त्याच्या कुटुंबाकडे पाठवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हृदय शस्त्रक्रियेनंतर चार्ल्सला काही समस्या आल्याचे त्यांनी सांगितले. चार्ल्सला आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता आहे.

चार्ल्स शोभराजवर डझनभर खून, चोरी आणि फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे गुन्हे आहेत. तो भारत, ग्रीससह दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये हवा आहे. मात्र, नेपाळ भेटीदरम्यान दोन परदेशी पर्यटकांच्या हत्येप्रकरणी चार्ल्सला २००३ मध्ये अटक करण्यात आली आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. नेपाळमध्ये जन्मठेपेच्या अंतर्गत २० वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT