पुढारी ऑनलाइन डेस्क : महागाई आणि बेरोजगारी विरोधात काँग्रेस 'चलो राष्ट्रपती भवन' असा संसद ते राष्ट्रपति भवनापर्यंत मार्च काढणार आहे. यामध्ये काँग्रेसचे खासदार तसेच विधानसभा विधान परिषदेचे आमदार सर्वजण सहभागी होणार आहेत. तर याच वेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व प्रधानमंत्री निवासस्थानाला घेराव टाकणार आहेत. या पार्श्वभूमिवर दिल्लीत विजय चौकात सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
यंग इंडियन लिमिटेड विरोधात ईडी ने केलेल्या कारवाईचा यावेळी निषेध करण्यात येणार आहे. सरकारने आम्हाला आम्ही आतंकवादी असल्यासारखी वागणूक दिली असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. तसेच महागाई आणि बेरोजगारी विरोधात देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
हे ही वाचा