पॅनिक बटन 
Latest

महिलांसाठी आता प्लॅटफॉर्मवर पॅनिक बटन

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेने महिला डब्यात सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा लावल्यानंतर आता प्लॅटफॉर्मवर देखील पॅनिक बटन लावण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई विभागात सर्वप्रथम प्रायोगिक तत्वावर भायखळा रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एक,दोन-तीन आणि चारवर प्रत्येकी दोन-दोन पॅनिक बटन महिला डबा येणार्‍या ठिकाणी लावले आहे. रेलटेल मार्फत याची तांत्रिक चाचणी यशस्वी झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या 117 स्थानकांत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. यापैकी 70 रेल्वे स्थानके मुंबईतील आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल धनराज नीला यांनी दिली.

मुंबईच्या लोकलने दररोज सुमारे 70 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यात सुमारे 22 टक्क्यांपेक्षा जास्त महिला प्रवाशांची संख्या आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करणार्‍या महिलांबाबतीत विनयभंग,चोरी आणि मारामारीच्या घटना घडतात. तातडीच्या मदतीची गरज असलेल्या महिला प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्मवर पॅनिक बटन बसवण्यात येणार आहे.

महिला डब्यासमोर सहज दिसणार्‍या ठिकाणी पॅनिक बटन बसवणार, बटन दाबताच अलार्म सुरू होऊन लाल दिवा पेटणार. प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेरा संबंधित व्यक्तीची हालचाल टिपून त्याची माहिती स्थानकातील आरपीएफच्या कार्यालयासह रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला देणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT