Latest

पुणे : ख्रिस्ती बांधवांकडून ख्रिस्त जन्मोत्सव साजरा; शहरातील चर्चमध्ये प्रार्थना

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चर्च आणि परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई… चर्च परिसरात उभारलेला ख्रिस्त जन्माचे देखावे… ख्रिसमस 'ट्री' ची नयनरम्य सजावट…, चर्चमधील प्रार्थना, गाणी, संदेश आणि शुभेच्छांचे वर्षाव, अशा आनंदमयी वातावरणात ख्रिस्ती बांधवांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ख्रिसमस सण साजरा केला. दरम्यान, यावेळी कोरोनाचे संकट लक्षात घेत, ख्रिस्त बांधवांनी सोशल डिस्टन्सिंगसह शासनाच्या 50 जणांची उपस्थिती या नियमाचे पालन केले.

पुणे शहरातील चर्च रोडवरील सेंट पॉल चर्च, रास्ता पेठेतील ख्राईस्ट चर्च, कसबा पेठेतील ब्रदर देशपांडे मेमोरिअल चर्च, कँम्प स्टेव्हली रोड येथील सेंट मेरी चर्च, घोरपडी पेठ येथील सेंट जोसेफ चर्च, कोंढवा खुर्द येथील अवर लेडी ऑफ लुडस चर्च, स्क्रेड हर्ट चर्च, एम्प्रेस गार्डन जवळील सेंट पॅट्रीक्स चर्च, क्वार्टरगेट चौकातील सिटी चर्च, बिशप हाऊस व शहरात ख्रिस्ती बांधवांच्या घरी येशु जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी ख्रिसमस ट्री, केक, बनविण्यात आले होते. सर्व ख्रिस्ती बांधवांनी यावेळी जगात सुख, समृध्दी आणि सगळीकडे शांतता, आनंददायी वातवरण कायम राहो आणि जगावर आलेले कोरोनाचे संकट जावो, अशी प्रभु येशुकडे प्रार्थना केली.

सेंट पॉल चर्चमध्ये सकाळपासूनच येशू ख्रिस्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. सायंकाळच्या सुमारास नाताळ गीते येशू ख्रिस्त जन्म प्रवचन आणि केक कापून एकमेकांना शुभेच्छा दिल्या गेल्या अजूनही कोरोना गेलेला नाही. त्यामुळे ख्रिस्ती बांधवांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करून आनंदी राहत ख्रिसमस हा सण साजरा करावा.
– प्रो. जॉश्व रत्नम चींताला, सचिव, पुणे धर्मप्रांत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT