पुढारी ऑनलाइन डेस्क : गेल्या वर्षी झालेल्या जेईई (मेन) पेपर लीकचा मुख्य सुत्रधार असलेल्या एका रशियन हॅकरला सीबीआयने सोमवारी पकडले. मिखाईल शर्गिन असे या रशियन हॅकरचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध एक लुक-आउट परिपत्रक जारी करण्यात आले होते. तो काल कझाकस्तानहून दिल्ली विमानतळावर आला असता इमिग्रेशन येथे त्याला ताब्यात घेण्यात आले.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिखाईल शर्गिनला चौकशीसाठी सीबीआयच्या मुख्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले असून रात्री उशिरा त्याला अटक होण्याची शक्यता आहे. त्याच्यावर आरोप आहेत की त्याने JEE(M) चे पेपर च्या iLeon सॉफ्टवेअरच्या प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये त्याने छेडछाड केली होती.
JEE (मुख्य) परीक्षा 2021 मध्ये अनियमितता केल्याच्या आरोपावरून दिल्लीतील एका खाजगी शैक्षणिक संस्थेविरुद्ध 1 सप्टेंबर 2021 रोजी एफआयआर दाखल केला होता. त्यात संस्थेचे संचालक, तीन कर्मचारी आणि काही मध्यस्थांच्या विरोधात हा एफआयर दाखल करण्यात आला होता. तसेच परीक्षा केंद्रावर तैनात असलेले कर्मचारी आणि काही दलालांचा यात सहभाग असल्याचा आरोप आहे.
एफआयआरनुसार, आरोपी कंपनी आणि तिचे संचालक जेईई (मुख्य) च्या ऑनलाइन परीक्षेत फेरफार करत होते आणि इच्छुक विद्यार्थ्यांना मोठ्या रकमेच्या बदल्यात टॉप एनआयटीमध्ये प्रवेश मिळवून देत होते.
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पहिले सिस्टममध्ये फेरफार करत असत. त्यानंतर ज्या अर्जदारांकडून पैसे घतेले आहे त्यांच्या प्रश्नपत्रिका हॅक करून सोडवत होते. यावर हरियाणातील सोनपत येथील एका विशिष्ट परीक्षा केंद्रातून रिमोट ऍक्सेसद्वारे नियंत्रण ठेवण्यात येत होते.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार एजन्सीचे प्रवक्ते आर सी जोशी म्हणाले की, आरोपी त्यांच्याकडे पैसे भरणा-या अर्जदारांकडून दहावी आणि बारावीच्या मार्कशीट, युजर आयडी, पासवर्ड आणि त्यांच्याकडून पोस्ट डेटेड चेक सुरक्षा म्हणून घेऊन ठेवत असत. प्रति उमेदवार 12 ते 15 लाख रुपये इतकी रक्कम ते घ्यायचे.
एफआयआर नोंदवल्यानंतर, दिल्ली-एनसीआर, पुणे, जमशेदपूर, इंदूर आणि बंगळुरू येथे 19 ठिकाणी झडती घेण्यात आल्या, ज्यामुळे 25 लॅपटॉप, सात पीसी, सुमारे 30 पोस्ट-डेटेड चेक, मार्कशीट आणि मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखले आणि उपकरणे जप्त करण्यात आली. तपासादरम्यान, काही परदेशी नागरिक काही भारतीय नागरिकांशी टक्कर देऊन जेईईसह अनेक ऑनलाइन परीक्षांमध्ये तडजोड करत असल्याचे समोर आले.
आरोपी मिखाईल शर्गिनला असे घेतले ताब्यात
तपासा दरम्यान संशयिताची जप्त केलेल्या लॅपटॉप आदी उपकरणातून विस्तृत तांत्रिक घुसखोरीच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर लुक आउट नोटीस जारी करून इमिग्रेशन ब्युरोने संशयिताला प्रवासादरम्यान ताब्यात घेण्यास सांगितले.