पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमधील बागेश्वरमध्ये रविवारी भीषण अपघात झाला. चिदांग येथे पहाटे पाचच्या सुमारास एक कार दरीत कोसळली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
वडुडा सानेती (रिमा) येथून कार बागेश्वरकडे येत होती. पहाटे पाच वाजता चिदांगजवळ कार दरीत पडली. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृतांमध्ये एकाच गावातील तीन तरुणांचा समावेश आहे. पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल आहे.
हेही वाचा :