पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला (IPL 2023 Sanju Samson) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यादरम्यान संथ गतीने षटके टाकल्याप्रकरणी १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. आयपीएलमध्ये स्लो ओव्हर रेट हा पुन्हा एक मोठा मुद्दा बनला आहे. कारण बहुतेक सामने चार तासांपेक्षा जास्त वेळ खेळले जात आहेत. याबाबत आयपीएलने एक निवेदन जारी केले आहे, यामध्ये आयपीएल आचारसंहितेअंतर्गत स्लो ओव्हर रेटशी संबंधित हा संघाचा पहिला गुन्हा ठरला आहे. त्यामुळे कर्णधार संजू सॅमसनला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे, असे म्हटले आहे.
राजस्थानमध्ये (IPL 2023 Sanju Samson) शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा ३ धावांनी पराभव झाला. राजस्थानचा चार सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे. तर चेन्नईला या मोसमात दोन पराभव स्वीकारावे लागले आहे.
जोस बटलरच्या अर्धशतकानंतर गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे बुधवारी येथे झालेल्या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा ३ धावांनी पराभव करून राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. १७६ धावांचा पाठलाग करताना कर्णधार महेंद्रसिंग धोनी (१७ चेंडूत नाबाद ३२, १ चौकार, ३ षटकार) आणि रवींद्र जडेजा (१५ चेंडूत नाबाद २५) सलामीवीर डेव्हॉन कॉनवे (५०) यांच्या अर्धशतकी खेळी आणि ६ विकेट्सवर १७२ धावा केल्या.
हेही वाचा