पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात गुरुवारपासून (दि.13) सुरू झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनने सांगितले की, तो गंभीर आजाराने ग्रस्त आहे. त्याला किडनीचा आजार आहे. (Cameron Green)
ग्रीनने चॅनल 7 दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "जेव्हा माझा जन्म झाला. तेव्हा माझ्या पालकांना सांगण्यात आले की मला मूत्रपिंडाचा आजार आहे. मुळात कोणतीही त्यावेळी मला लक्षणे नव्हती. ती फक्त अल्ट्रासाऊंडद्वारे आढळून आली होती. क्रॉनिक हा किडनीच्या आरोग्याशी संबंधित एक आजार आहे. (Cameron Green)
24 वर्षीय ग्रीनने सांगितले की, त्याचे किडनी सध्या सुमारे 60 टक्के कार्यरत आहे. सध्या तो दुसऱ्या टप्प्यात आहे. पाचव्या टप्प्यात प्रत्यारोपण किंवा डायलिसिस करणे आवश्यक आहे.
ग्रीनची आई, टार्सी यांनी आपल्या गरोदरपणाच्या 19 व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड केला तेव्हा ही स्थिती आढळून आली होती. ग्रीनचे वडील गॅरी म्हणाले की, ग्रीन 12 वर्षांच्या पुढे जगणार नाही अशी भीती वाटत होती. परंतु, ग्रीनने ऑस्ट्रेलिसाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून 2020 मध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 24 कसोटी, 23 एकदिवसीय आणि आठ टी-20 सामने खेळले आहेत.
हेही वाचा :