Latest

१२ लाखांचे बजेट अन्‌ ९ कोटींची कमाई! ‘या’ सुपरस्टारसह चित्रपटने माजवली खळबळ

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आजच्या काळात चित्रपट बनवण्यासाठी सरासरी 100 ते 200 कोटीं पर्यंतचे बजेट लागते. पण पूर्वीच्या काळी असे महागडे चित्रपट बनवण्यात येत नव्हते. पूर्वीच्या चित्रपटांमध्ये कथेत ताकद असणे जास्त महत्त्वाचे होते. असाच एक चित्रपट 1989 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात 3 स्टार्सच्या त्रिकुटाने असे रंगतदार चित्रपट बनवले की चाहते वेडे होत असे. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. याशिवाय नाना पाटेकर यांनीही या चित्रपटात आपला दमदार अभिनय केला.

12 लाखांचे बजेट आणि कमाई 9 कोटींची

विधू विनोद चोप्राने पीके, मुन्नाभाई एमबीबीएस आणि 3 इडियट्स सारखे चित्रपट केले आहेत. दिग्दर्शकाने एका मुलाखतीत खुलासा केला की, 1989 मध्ये रिलीज झालेल्या 'परिंदा' चित्रपटाचे बजेट फक्त 12 लाख रुपये होते. परंतु या चित्रपटाने रिलीज होताच खळबळ उडवत ९ कोटींची कमाई केली. विधू विनोद चोप्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता, लेखक आणि अभिनेतेही म्‍हणून काम केले.

एकाच वेळी तीन भूमिका; विधू विनोद चोप्रा

विधू विनोद चोप्राने या चित्रपटात तीन भूमिका केल्या. विधू विनोद चोप्रा यांनी बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यामध्ये परिंदा हा एक चित्रपट आहे. या चित्रपटात दोन भावांची कथा असून ते मुंबईत आपले जीवन जगतात. यानंतर एक भाऊ अभ्यासासाठी अमेरिकेला जातो आणि तेथे वाईट संगतीत पडतो. अशी कथा दाखवण्यात आली आहे.

.हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT