पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वस्तूंसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ईलेक्ट्रिक कारसह बॅटरीवर चालणाऱ्या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पीय भाषणात सीतारमण यांनी अनेक वस्तूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली आहे. बॅटरीवर चालणाऱ्या आणि इलेक्ट्रिक वस्तूंसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. कस्टम ड्युटी दर २१ वरून १३ पर्यंत खाली आणण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे ईलेक्ट्रिक कार स्वस्त होण्याची शक्तता आहे. बॅटरीजवरील कस्टम ड्युटी २.५ टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच देशात मोबाईल फोनच्या उत्पादनात वाढ झाली असून मोबाईल फोनच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा प्रस्ताव असल्याने मोबाईल फोन देखील स्वस्त होण्याची शक्यता आहे.
वाहन उद्योग क्षेत्र हे भारताच्या आर्थिक वाढीचा प्रमुख आधार आहे. उत्पादन निर्मिती क्षेत्रात सर्वात मोठे योगदान देत आहे. भारतीय विद्युत शक्तीवरील वाहनांचा ईव्ही विक्रीत 2030 पर्यंत एक कोटी टप्पा ओलांडण्याची आशा आहे. या माध्यमातून ५ कोटी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. वाहन निर्मिती क्षेत्रात भारत वेगाने प्रगती साधत असून, डिसेंबर 2022 मध्ये विक्रीच्या बाबतीत जपान आणि जर्मनीला मागे टाकत भारतातील सर्वात मोठा वाहन विक्रेता बनला आहे. हरित ऊर्जेच्या दिशेने होणाऱ्या संक्रमणामध्ये वाहन निर्मिती क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित आहे. देशांतर्गत 2022-23 दरम्यान ४९ टक्के चक्रवाढ दराने वाढेल, अशी आशा आहे. 2030 पर्यंत वार्षिक विक्री एक कोटी वाहनांपर्यंत पोहोचेल असे त्यात म्हटले आहे.
2022 मध्ये भारतात सुमारे दहा लाख ई वाहनांची विक्री झाली. 2019 मध्ये भारत प्रवासी वाहनांचा जगातील चौथा सर्वात मोठा उत्पादक होता. 2021 अखेर 3.7 कोटी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करताना वाहन निर्माण क्षेत्राचे 7.1 कोटी योगदान राहिले तर निर्मिती क्षेत्रामध्ये 49 टक्के योगदान राहिले आहे. मोबाईल फोन, ग्राहक उपयोगी वस्तू आणि उद्योग क्षेत्र यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.