Latest

विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणा, माझा तुम्हाला पाठिंबा : ठाकरेंचे शिंदे गटाला आवाहन

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणा, मी तुम्हाला पाठिंबा देतो असे जाहीर आवाहन शिंदे गटाला उद्धव ठाकरेंनी आज (दि. १६) पत्रकार परिषदेत केले.वरळी येथे आज ठाकरे गटाची महापत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना ठाकरेंनी शिंदेंसह भाजपवर टीका केल्या.

दरम्यान निकालावर बोलत असताना ठाकरे म्हणाले की, असं समजा एखादी व्यक्ती बँकेमध्ये खाते काढायला गेली तर म्हणते तुमचं खातंच नाही आमच्याकडे. त्याप्रमांणे सर्वच पक्ष भाजपला संपवायचे आहेत. लोकशाहीची हत्या करण्याचं काम सध्या सुरु आहे. पण त्यांना माहिती नाही की ही माती गद्दारांना जमिनीत गाडेल. एका लबाडाने नव्हे एका लवादाने निकाल दिला. मिंधे गट उच्च न्यायालयात गेला. तिथेही टाईमपास करण्यासाठी मिंधे गट गेला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ साली मुख्यमंत्री झाले त्यावेळी माझा पाठींबा घेतला. हा पाठींबा शिवसेना म्हणूनच घेतला ना असा सवाल उपस्थित केला. आता आमचा निकाल जनतेच्या कोर्टात आहे. जनतेनच ठरवावं आम्ही पात्र की अपात्र असे ठाकरे यांनी सांगितले.
अध्यक्षाविरोधात अविश्वासाचा ठराव आणा मी मिंधे गटाला पाठींबा देतो असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

आमदार पात्र-अपात्रतेच्या लढाईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सरशी झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाचा निकाल देताना, शिवसेना पक्ष हा बहुमताच्या आधारावर एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निकाल गुरुवारी (दि.११) दिला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आज (दि.११) महा पत्रकार परिषद बोलत होते. (Maharashtra Politics)

कोंबडं झाकण्याचा कितीही प्रयत्न…

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपल्य़ा 'X' खात्यावर आज (दि.१६) होणाऱ्या जाहीर महा पत्रकार परिषदेचा टीझर शेअर करत म्हटलं आहे की,"आमची बाजू संविधानाची आहे, लोकशाहीची आहे आणि सत्याची आहे. त्यामुळे कोंबडं झाकण्याचा कितीही प्रयत्न केलात, तरी सूर्य उगवायचा राहणार नाही. जनता न्यायालय! सत्य ऐका आणि विचार करा!"

पंचवीस मिनीटांच्या टीझरमध्ये म्हटलं आहे की, "घटनेला पायदळी तुडवून तुम्ही लाख खोट्याच्या बाजूने निकाल द्याल. पक्ष चोरायचा प्रयत्न कराल; पण कोंबड कितीही झाका, सूर्य उगवायचा राहणार नाही. खोट्याचं खरं होणार नाही. आमची बाजू संविधानाची आहे, लोकशाहीची आहे आणि सत्याची आहे. हीच बाजू आज जनतेच्या न्यायालयात मांडली जाणार, दुपारी चार वाजता सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, एन.एस.सी.आयय वरळी-मुंबई. जनता न्यायालय! सत्य ऐका आणि विचार करा! शिवसेना पक्ष प्रमुखश्री उद्धव ठाकरे"

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT