Latest

ब्रेस्ट सर्जरीचा दिला होता सल्ला : अनन्या पांडे

Shambhuraj Pachindre

बॉलीवूडमधील प्रवास स्टारकिडस्साठीही फारसा सुखावह नसतो असे आता अनन्या पांडेच्या उदाहरणावरून दिसून आले आहे. चंकी पांडेच्या या कन्येलाही सुरुवातीच्या काळात बॉडी शेमिंगला आणि विचित्र सल्ल्यांना सामोरे जावे लागले होते. त्याबाबतचा धक्कादायक खुलासा तिने एका मुलाखतीत केला आहे. तिने सांगितले की करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला लिंगभेदाचा सामना करावा लागला होता. इतकेच नव्हे तर तिला ब्रेस्ट सर्जरी करून घेण्याचाही सल्ला देण्यात आला होता.

ती म्हणाली, लोकांनी मला चेहरा आणि बॉडीसोबतच ब—ेस्ट सर्जरीही करण्यास सांगितले होते. माझ्यासाठी हे खूप वेदनादायी होते. मी ज्यावेळी काम करण्यास सुरुवात केली त्यावेळी लोकांनी मला फार विचित्र सल्ले दिले. अनेकांनी मला वजन वाढवण्यासही सांगितले. अनन्याने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इअर-2' मधून पदार्पण केले होते. त्यानंतर ती कार्तिक आर्यनसमवेत 'पती, पत्नी और वो' तसेच सिद्धांत चतुर्वेदीसोबत 'गहराईयाँ' मध्ये झळकली होती. आता ती दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडासमवेत 'लायगर'मध्ये दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT