Latest

Breast Cancer : स्तनाचा कर्करोग आणि मानसिक आरोग्य

Arun Patil

स्तनाच्या कर्करोगात (Breast Cancer) एखाद्या व्यक्तीला शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन यांसारख्या उपचारांमुळे मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते. शस्त्रक्रियेमुळे स्तन काढावे लागले, तर स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर खूप परिणाम होतो. उपचारादरम्यान रुग्णाला सर्वात जास्त भावनिक आधाराची गरज भासते आणि यावेळी रुग्णाला भावनिक आधार मिळाला नाही, तर त्या रुग्णाला खूप एकाकी वाटू लागते.

स्तनाचा कर्करोग असलेल्या महिलांसाठी टिप्स

तणावमुक्त राहा : स्तनाच्या कर्करोगाने (Breast Cancer) ग्रस्त असलेल्या महिलांनी स्वत: च्या आरोग्याची काळजी घेत असताना मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. गरज भासल्यास समुपदेशनासारखा पर्याय निवडणे जेणेकरून तणावाचे व्यवस्थापन करता येईल. ध्यानधारणा किंवा योगसाधना केल्यास उपचारादरम्यान येणारा मानसिक तणाव आणि नैराश्य दूर करण्यास तसेच त्याचे नियोजन करण्यास मदत होऊ शकते.

फळे, भाज्या, कडधान्ये, मसूर आणि तृणधान्याचा समावेश असलेला संतुलित आहाराचे सेवन करा. संपूर्ण उपचार प्रक्रियेदरम्यान रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूण आरोग्यासाठी योग्य पोषण महत्त्वपूर्ण असते.

शारीरिकद़ृष्ट्या सक्रिय राहणे हे शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवण्यास, थकवा कमी करण्यास आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते.

फॅालोअप गरजेचा : स्तनाच्या कर्करोगात (Breast Cancer) शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन यांसारख्या उपचारांमुळे केवळ शारीरिकच नव्हेतर मानसिक उपचारांची ही गरज भासते. महिलांनी या काळात पुरेशी विश्रांती घेणे, संतुलित आहाराचे सेवन करणे आणि प्रियजन तसेच समुपदेशकांकडे मानसिक आरोग्यावर चर्चा करणे व स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. नियमित तपासणी आणि फॅालोअपही गरजेचे ठरते.

यशस्वी उपचार तसेच कर्करोगावर मात करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत संतुलित आहाराचे सेवन, नियमित व्यायाम तसेच सर्वांगीण आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रत्येक स्त्रीचा कर्करोगाचा अनुभव वेगवेगळा असतो. त्यासाठी एखादी शंका वाटल्यास डॉक्टरांशी खुलेपणाने संवाद साधणे गरजेचे असते. कर्करोगात सकारात्मक मानसिकता बाळगणे आणि रोगावर मात करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असणे, हे देखील तितकेच आवश्यक आहे. (Breast Cancer)

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT