Latest

Breaking ! विजय शिवतारे बारामती लोकसभा अपक्ष लढणारच : ठराव मंजूर

Laxman Dhenge

पुणे : पुढारी ऑनलाइन डेस्क : बारामती लोकसभा हा मुद्दा सद्या जास्त चर्चेत आहे. अशातच बारामती लोकसभा हा मुद्दा अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला असतानाच शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी सुध्दा आपण बारामती लोकसभेला अपक्ष उतरणार असे जाहीर केले आहे. यासंदर्भात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून त्यामुळे बारामती लोकसभेला तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. या निर्णयाने शिंदे आणि अजित पवार गटातही ठिणगी पडण्याची चिन्हे दिसत आहेत. आज (13 मार्च) सासवडमध्ये माजी आमदार विजय शिवतारे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत शिवतारे यांच्या बारामती लोकसभेच्या उमेदवारीचा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला. विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचे सांगतिले. विजय शिवतारे यांच्या या निर्णयामुळे बारामतीमध्ये महायुतीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ हा काय कोणाचा सातबारा नाही.

विजय शिवतारे म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघ हा काय कोणाचा सातबारा नाही. मी देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेच्या मतदारसंघ आणि मालकी कोणाची नाही. सहा विधानसभेचे मतदारसंघ आहे. आपला स्वाभिमान जागृत होऊन आपण लढलं पाहिजे. विशेषतः अजित पवार 2019 च्या निवडणुकीमध्ये मी जरी त्यांच्या मुलाविरुद्ध प्रचार केला होता तो राजकारणाचा एक भाग होता आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता. वैयक्तिक काही नव्हतं. परंतु, अजित पवारांनी सभ्यतेच्या साऱ्याच पातळ्या पातळी ओलांडल्या आहेत. शिवतारे पुढे म्हणाले की, अजित पवार यांनी नीच पातळी ओलांडूनही मी त्यांना माफ केलं, त्यांचा सत्कार केला. तरीही त्यांच्यातील गुर्मी तशीच होती, अशी टीकाही शिवतारे यांनी केली केली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT