नवी मुंबई ; पुढारी वृतसेवा : महापे शिळफाटा दरम्यान अडवली भुतवलीजवळ आज (दि.०५) मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तेल माफियांनी बीपीसीएलची इंधन लाईन फोडली. यामुळे अचानक आगीचा भडका उडाला. २० बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात नवी मुंबई अग्निशमन दलाला ११ वाजता यश आले.
याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या आगीत जीवीत हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दिली.