Latest

Box Office : हृतिक-सैफच्या ‘विक्रम वेधा’पेक्षा ‘पोन्नीयिन सेल्वन 1’चे कलेक्शन दुप्पट!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) स्टारर फिल्म विक्रम वेधा (Vikram Vedha) 30 सप्टेंबर रोजी रिलीज झाली आहे. तर दुसरीकडे मणिरत्नमचा मल्टी-स्टारर चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन 1' (Ponniyin Selvan 1) रिलीज झाला आहे. प्रेक्षक अनेक दिवसांपासून या दोन्ही चित्रपटांची वाट पाहत होते. त्यामुळे कोणत्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जादा कमाई केली, हा सर्वांच्या उत्सुकतेचा विषय बनला आहे.

'पोनियिन सेल्वन 1'चे कलेक़्शन किती आहे?

मणिरत्नमच्या 'पोनीयिन सेल्वन 1'च्या कमाईचा आलेख उंचावत आहे. ट्रेड ॲनालिस्ट रमेश बाला यांच्या मते, चित्रपटाने दोन दिवसांत जगभरात 150 कोटींहून अधिक कमाई केली असून हा चित्रपट अमेरिकेत चांगला व्यवसाय करत आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने सर्व भाषांसह देशभरात 37 कोटींचे कलेक्शन केले होते, तर दुसऱ्या दिवशी सुरुवातीच्या ट्रेंडनुसार चित्रपटाचे कलेक्शन 27-28 कोटी असू शकते. म्हणजे, चित्रपटाच्या एकूण कलेक्शनने सुमारे 65-68 कोटीचा आकडा गाठल्याची शक्यता आहे.

विक्रम वेधा'चे कलेक़्शन किती?

हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा विक्रम वेधा हा चित्रपटाने पहिल्या दिवशी काही खास कमाई केली नाही. 'पोनियिन सेल्वन 1' आणि हृतिक-सैफच्या 'विक्रम वेधा'शी टक्कर झाली. 'पोनियिन सेल्वन 1'चे कलेक्शन चांगले दिसत असले तरी विक्रम वेधाचे कलेक्शन अपेक्षेपेक्षा कमी दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 10.58 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे सुरुवातीच्या ट्रेंडनुसार दुसऱ्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 12.50-12.75 कोटी रुपये असू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT