पुढारी ऑनलाईन डेस्क : चार वेळा मिस्टर इंडियाचा मान मिळवणाऱ्या जगविख्यात मराठमोळ्या बॅाडीबिल्डर आशिष साखरकर याचे निधन झाले. देश- विदेशात महाराष्ट्राचा डंका वाजवणाऱ्या आशिषने मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र श्री यांसारखे अनेक किताब आपल्या नावावर केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो आजाराशी झुंज देत होता. अखेर आज त्याची झुंज अयशस्वी ठरली.
आशिष साखरकर म्हणजे बॅाडीबिल्डिंग जगतातले एक मोठे नाव मानले जाते. जगभरात अनेक स्पर्धा जिंकून त्याने नेहमी देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता. आशिष चार वेळा मिस्टर इंडिया विजेता, चार वेळा फेडरेशन कप विजेता, मिस्टर युनिव्हर्स रौप्य आणि कांस्य, मिस्टर आशिया रौप्य, युरोपियन चॅम्पियनशिप, शिवछत्रपती पुरस्कार, असे सन्मान त्याने पटकावले होते. आज त्याच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
आशिषच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. बॉडीबिल्डिंग विश्वातील मान्यवर असलेल्या आशिष साखरकर यांच्या निधनाने मन हेलावून गेले आहे. त्यांच्या जाण्याने बॉडी बिल्डिंग क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा :