Latest

Srinagar | श्रीनगरच्या झेलम नदीत बोट उलटली, ४ जणांचा मृत्यू, ५ शाळकरी मुलांसह अनेकजण बेपत्ता

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : जम्मू- काश्मीरच्या श्रीनगरमधील झेलम नदीत मंगळवारी सकाळी एक बोट उलटली. या बोटीतून ११ लोक प्रवास करत होते. त्यात ५ शाळकरी मुले होती. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ७ जणांना वाचवण्यात आल्याचे वृत्त आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि सुरक्षा जवान घटनास्थळी बचावकार्य करत आहे. ही बोट रोज लोकांना घेऊन गंदबाल येथून बटवारा येथे जात होती.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे झेलम नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. श्रीनगरमधील एसएमएचएस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मुझफ्फर जरगर यांनी सांगितले की, सात जणांना रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यापैकी चारजणांचा मृत्यू झाला आणि इतर तीन जणांवर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये २ महिलांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT