नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: ओडिशा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या ११२ उमेदवारांची यादी आज जाहीर केली. ओडिशा भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल हे चंदाबलीमधून तर भाजप नेते मनोजकुमार मेहर जुनागढमधून निवडणूक लढवणार आहेत. बिजू जनता दलाचे प्रमुख आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या विरोधात भाजपने शिसिर मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे. हिंजली मतदारसंघातील ही लढत लक्षवेधी होणार आहे. Odisha Assembly Election 2024
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने १४७ पैकी २३ जागा जिंकल्या होत्या. तर सत्तेत असलेल्या बिजू जनता दलाने ११२ जागा जिंकल्या होत्या. ओडिशातील विधानसभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकांसोबतच होणार आहेत. त्यामुळे लोकसभेबरोबर होत असलेल्या या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे. तर पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न बिजू जनता दलाच्या वतीने होणार आहे. Odisha Assembly Election 2024
प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपने पक्षाच्या नेत्या जयंता कुमार सारंगी यांना पुरीमधून उमेदवारी दिली आहे. तर कटक सदरमधून प्रकाश चंद्र सेठी आणि भुवनेश्वर मध्यमधून जगन्नाथ प्रधान यांना उमेदवारी दिली आहे.