नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 12 उमेदवारांची आणखी एक यादी आज जाहीर केली आहे. या यादीत तुला उमा या एकमेव महिला उमेदवार आहेत. व्ही. सुभाष रेड्डी आणि चालमला कृष्णा रेड्डी या नुकतेच काँग्रेसमधून भाजपात आलेल्यांनाही तिकीट मिळाले आहे.
यापूर्वी 2 नोव्हेंबर रोजी भाजपने 36 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या 12 उमेदवारांसह आता एकूण उमेदवारांची संख्या 100च्या वर झाली असून यात 14 महिला उमेदवारांचा समावेश आहे.
तेलंगणा निवडणुकीसाठी भाजपची चौथी यादी जाहीर
तेलंगणात भाजपला अभिनेता-राजकीय नेता पवन कल्याण यांचा जनसेनेची साथ लाभली आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा निकाल इतर 4 राज्यांच्या बरोबर 3 डिसेंबर रोजी लागणार आहे.
येथून यांना उमेदवारी
चेन्नूर (एससी) : दुर्गम अशोक
येल्लारेड्डी : वेद्दापल्ली रेड्डी वेमुलावाडा : तुला उमा (महिला)
हुस्नाबाद : बोम्मा चक्रवर्ती
सिद्दीपेट : दुडी श्रीकांत रेड्डी विकाराबाद (एससी) : नवीन कुमार
कोडांगल : बंटू रमेश कुमार
गदावल : बोया शिवा
मिरयालगुडा : सैडिनेनी श्रीनिवास मुनुगोडे : चालमल्ला कृष्ण रेड्डी
नकरेकल (एससी) :
नाकरेकांति मोगुलैया
मुलुग (एसटी) :
अजमिरा प्रल्हाद नाईक