Latest

Bitter gourd Recipe : कुरकुरीत-मसालेदार कारली कशी कराल?

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : जेवणात कडू कारलं म्हंटलं की, अनेकांची नाकं मुरडतात. तर अनेकांना कारल्याची भाजी खूप आवडते. पण, आज आपण ज्यांना कारलं कडू लागतं अशांसाठी कुरकुरीत कारल्याची रेसिपी (Bitter Melon Recipe) कशी करायची, हे पाहणार आहोत. ही रेसिपी केली की, न आवडणाऱ्यालादेखील कारलं जरूर आवडेल. चला तर 'कुरकुरीत कारली' कशी करायची ते पाहू…

[saswp_tiny_recipe recipe_by="स्वालिया शिकलगार" course="मेन कोर्स" cusine="भारतीय" difficulty="सोपी" servings="3" prepration_time="" cooking_time="" calories="" image="" ingradient_name-0="तीन कारली" ingradient_name-1="तेल" ingradient_name-2="एक कांदा" ingradient_name-3="गरजेनुसार तिखट" ingradient_name-4="मीठ, हळद, गूळ, हिंग" ingradient_name-5="आमचूर, कोथिंबीर" ingradient_name-6="अर्धा चमचा जिरेपूड" direction_name-0="सुकं खोबरं एक वाटी, तीळ एक चमचा, जिरं एक चमचा भाजलेलं, हरभरा डाळ पाव वाटी, उडीद डाळ एक चिमूट, लाल मिरची एक. हे सर्व जिन्नस खमंग, कोरडे भाजून घेऊन सर्व साहित्य एकत्रितपणे वाटून घ्यावं." direction_name-1="कारल्याचे फक्त देठ काढून बोटभर लांबीचे एकसारखे काप करावेत. उकळत्या पाण्यात एक चिमूट हळद व एक चिमूट मीठ घालून कारल्याचे तुकडे टाकावेत. झाकण ठेवून पाच मिनिटं सळसळ उकळून घ्यावेत." direction_name-2="नंतर चाळणीत किंवा रोवळीत ओतून पाणी काढून टाकावं. त्यावर लगेच थंड पाणी ओतून पाणी पूर्णपणे निथळल्यावर तुकडे मुठीत दाबून पाणी काढून टाकावं. हे करताना तुकडे मोडू देऊ नयेत. ते सर्व तुकडे कागदावर दहा मिनिटं पसरावेत" direction_name-3="अर्धी वाटी तेल गरम करून कार्ल्याचे तुकडे चुरचुरीत कुरकुरीत तळून काढावेत. बारीक चिरलेला कांदा त्याच तेलात परतावा. कारली-कांदा काढून घेऊन त्याच कढईत किंवा दुसऱ्या पॅनमध्ये चवीनुसार गूळ घ्यावा आणि दीड वाटी पाणी घालून गरम करावं. त्याचा पाक होणार नाही याची काळजी घ्यावी." direction_name-4="गूळ विरघळला की, त्यात तिखट, मीठ, हळद, हिंग, आमचूर, जिरेपूड, कोथिंबीर आणि वरील मसाला यांचं एकत्रित मिश्रण करून घालावं. कारली व कांदा घालावा. मिश्रण कारल्याच्या सर्व फोडींना लागलं पाहिजे." notes_name-0="तुम्ही ही कारली भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता. त्याचबरोबर ऑफिसदेखील घेऊन जाऊ शकता. साधारणपणे कारले कितीही कडू असते तरी, ही कुरकुरीत कारल्याची भाजी तुम्हाला नक्की आवडेल. एका जरूर ट्राय करा." html="true"]

खालील रेसिपी आवश्य ट्राय करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT