prabhu deva  
Latest

HBD Prabhu Deva: प्रभु देवाने सावरलं होतं सलमानचं बुडतं करिअर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ चित्रपटांमध्ये स्टार्स केवळ आपल्या अभिनयामुळे नाही तर डान्ससाठीही ओळखले जातात. यापैकी एक आहे – सुपर टॅलेंट अभिनेते प्रभू देवा. भारताचा मायकल जॅक्सन प्रभु देवाचा (HBD Prabhu Deva) डान्स देशातचं नाही तर परदेशातही लोकप्रिय आहे. तुम्हाला माहितीये का, सलमानच्या करिअरची नौका डगमगताना प्रभू देवाने त्याची नौका पार केली होती. (HBD Prabhu Deva)

प्रभु देवा आज ३ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. प्रभु देवाचा जन्म कर्नाटकातील मैसूर येथे झाला. प्रभुदेवाचेवडील मुगुर सुंदर साऊथ चित्रपट इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर होते. प्रभुदेवाने आपल्या वडिलांप्रमाणे डान्सर बनण्याचे स्वप्न पाहिले आणि ते साकारलंदेखील. त्याने भरतनाट्यम शिवाय अनेक क्लासिकल डान्स फॉर्मचे प्रशिक्षण घेतले.

प्रभु देवाने डान्समध्ये जादू दाखवलीच, शिवाय बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या बुडत्या करिअची नौकादेखील पार केली. २००२ ते २००७ पर्यंत सलमानचे करिअर जवळपास बुडत आलं होतं. एक वेळ होती, जेव्हा सलमानचे अनेक चित्रपट सातत्याने फ्लॉप होत होती. आणि कुठलाही मार्ग दिसत नव्हता. प्रभु देवाने सलमानच्या करिअरची बुडती नौका पार केली. प्रभु देवाने पहिल्यांदा सलमान खानसोबत २००९ मध्ये 'वॉन्टेड' चित्रपटात काम केलं होतं. हा त्याचा बॉलीवूड डेब्यू चित्रपट होता. या चित्रपटामध्ये प्रभू दिग्दर्शक होता. हा चित्रपट ऑडियन्समध्ये ब्लॉकबस्टर ठरला होता.

नव्वद च्या दशकात हमसे से है मुकाबला या चित्रपटातून त्याने सुरुवात केली होती. प्रभुदेवाने असा डान्स केला की, प्रेक्षकदेखील अचंबित राहिले. आजदेखील प्रभु देवाचा डान्स प्रेक्षकांना वेड लावणारा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT