Latest

बिग बॉस मराठी : उत्कर्षला मीरा जगन्नाथचा पाठिंबा नाही

स्वालिया न. शिकलगार

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना कोणचा पाठिंबा आहे आणि कोणाचा नाही हे जाणून घेणे खूप महत्वाचे असते. कधी कधी एखादा सदस्य चांगला स्पर्धक आहे म्हणून तर कधी आपली मैत्री आहे म्हणून तर कधी दिलेला शब्द पाळण्यासाठी अशा अनेक कारणास्तव सदस्य घरातील दुसर्‍या सदस्याला वाचवतात. आणि काही कारणांसाठी नॉमिनेशनमध्ये टाकतात. फक्त नॉमिनेशनच नाही तर आपल्या जवळचा माणूस या बिग बॉस मराठीच्या घरात लाभण वा तो आपल्यासोबत असण खूप महत्वाचं असतं. आज मीरा जगन्नाथ आणि उत्कर्ष याचविषयी चर्चा करताना दिसणार आहेत. उत्कर्षला मीरा जगन्नाथचा पाठिंबा नसणार आहे.

जगन्नाथ उत्कर्षशी बोलताना म्हणाली, जे काही झालं, आपण सगळे वेगळे झालो ठीक आहे. जय आणि स्नेहा एकमेकांसाठी असणार आहेत पुढे. तुझ्याबरोबर कोण आहे?

उत्कर्ष म्हणाला, तू. यावर जगन्नाथ म्हणाली, नाही. मी आणि गायत्री आम्ही दोघी तुला सपोर्ट करायचो. मग आता असं वागल्यावर नाही करणार तुला सगळ्यांसमोर सपोर्ट.

उत्कर्ष म्हणाला-नका करू, तुम्ही तुमचा गेम खेळाना. जगन्नाथ म्हणाली, मी संगते आहे तुला हे… मी माझा खेळतेच आहे.
उत्कर्ष म्हणला, तुला काय वाटतं माझ्या डोक्यात हा विचार नाही आला ? पण गायत्रीचं डामाडोल मला वाटतं आहे बरं का… म्हणजे मला तिची चिंता वाटते आहे. तिची जी खेळण्याची पध्दत आहे ना…

जगन्नाथ म्हणाली, ती ज्या पध्दतीने दोन आठवड्यापासून वागते आहे. मी तिला सरळ म्हंटल आहे पुढे मला असं काही वाटलं तर मी कोणाचं पण नावं घेईन. असं मी तिच्यावर तोंडावर बोले आहे. मी फेर खेळणार आहे.

आता कोण कोणाला सपोर्ट देणार ? कोणकोणाच्या विरोधात जाणार ? बघूया. तेव्हा जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT