Latest

Bigg Boss15 : तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचा रोमॅंटिक व्हिडिओ व्‍हायरल

सोनाली जाधव

_

बिग बॉस १५ (Bigg Boss15 🙂 मध्ये अलिकडच्या काही दिवसांत रोमॅंटिक वार सुरु आहे. प्रत्येक सीझनमध्ये कोणाचं ना कोणाचं अफेअरची चर्चा सोशल मीडियावर असते.  बिग बॉस १५ (Bigg Boss15 🙂 मधील पहिल्या कपलची आता चर्चा सोशल मीडियावर चांगलीच सुरु झाली आहे.  माइशा अय्यर आणि ईशान सहगल यांच्‍या नंतर या रियलिटी शोमध्ये टीव्ही स्टार करण कुंद्रा  (Karan Kundrra) आणि तेजस्वी प्रकाश यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली आहे.

Bigg Boss15: मला माझ्या भावना व्यक्त करता येत नाहीत

कालच्या एपिसोडमध्ये तेजस्वी आणि करण कुंद्रा यांच वागणं पाहता त्यांची जवळीक वाढत असल्‍याचे दिसत आहे.

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्यातील असलेला दुरावा यावरून तिने करण कुंद्राला विचारले असता, त्याने  तेजस्वीला सांगितले की, "मला माझ्या भावना व्यक्त करता येत नाहीत. जोपर्यंत माझ्या मनाला वाटत नाही. तोर्पंत तो आपल्या मनातील भावना व्यक्त करत नाही.

दाेघांचा रोमॅंटिक व्हिडिओ व्‍हायरल

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचा एक रोमॅंटिक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

यामध्ये  करण कुंद्रा झोपलेला आहे आणि तेजस्वी त्याला प्रेमाने उठवत आहे. त्याला ती म्हणतं आहे, तू बिग बॉस मधील नियम तोडत आहेस, बजर झाल्‍यानंतरही तू झोपला आहेस.

करण कुंद्राला तेजस्वी पुन्हा रोमॅंटिक होवून छेडताना दिसत आहे. हा रोमॅंटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल हाेताच चाहत्‍यांच्‍या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

हेही वाचलं का? 

पहा व्हिडिओ  :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT