devoleena bhattacharjee 
Latest

BB 15 : अभिजीत बिचुकलेने देवोलीनाकडे ‘KISS’ मागितल्याने मोठा राडा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

'बिग बॉस-१५' च्या (BB 15) घरात रोज नवा ड्रामा पाहायला मिळत आहे. एकीकडे निर्माते गेम आणखी कठीण करण्यासाठी वेगवेगळे टास्क कंटेस्टेंट्ससाठी आणत आहेत. दुसरीकडे घरात टास्क रद्द करण्यासाठी खूप प्रयत्न सुरू आहे. 'तिकिट टू फिनाले' टास्कदेखील रद्द करण्यात आला. परंतु, टास्क दरम्यान अभिजीत बिचुकलेने देवोलिना भट्टाचार्जीकडे किस मागून मोठा वाद उभा केला. (BB 15)

अभिजीतने मागितला किस

खरंतर टास्कमध्ये अभिजीत बिचुकले देवोलिना भट्टाचार्जीला पाठिंबा देऊन खेळत होता. यावेळी टास्कमध्ये तो देवोलिनासाठी चोरी करतानाही दिसत होता. परंतु, तेव्हा तो देवोलिनासाठी जीव देण्यासाठीही तयार आहे. पण, किस मागितल्याने देवोलिना भडकली. यामुळे जोरदार घरात गोंधळ उडाला.

देवोलिनाने अभिजीतला फटकारले

देवोलिनाने अभिजीतला म्हटलं, 'हे सर्व नाही. इतकचं नाही. काही वेळानंतर जेव्हा अभिजीत पुन्हा देवोलिनाशी बोलायला गेला, तेव्हा ती म्हणाली-लाईन क्रॉस करू नकोस.

bigg boss marathi 15

ती म्हणते-'मी या मुद्द्यावर तुझ्याशी बोलेन. लाईन क्रॉस करू नकोस.' यानंतर देवोलिना घरात अभिजीतच्या वागणुकीविषयी राखी सावंत आणि रितेशल सांगते. यानंतर बिग बॉसच्या घरात हाय-व्होल्टेज ड्रामा होतो. यावेळी अनेक सदस्य देवोलिनाला पाठिंबा देतात. तर काही कंटेस्टेंट अभिजीतला पाठिंबा देतात. देवोलिना- अभिजीतची मैत्री खूप चांगली आहे. ते नेहमी दंगा मस्ती करताना दिसतात.

अभिजीतने दिलं स्पष्टीकरण

या दरम्यान, अभिजीत बेडरूममध्ये एकटा झोपलेला असतो. याप्रकरणी तो स्पष्टीकरण देताना दिसतो. तो म्हणतो की, 'ती माझी काळजी घेते. मागील १५ दिवसांपासून ती लक्ष ठेवतेय. ती खूप चंगलीय. आणि आमची मैत्री देखील खूप चांगली आहे. आम्ही दोघे एकत्र असतो. तिने हा मुद्दा का उचलला, मला हे माहित नाही. मी चुकीचं आहे तर आहे मी चुकीचा. मी सॉरीदेखील बोललो. ती स्वीकारतेदेखील. पण, नंतर पुन्हा म्हणते की, तू चुकीचा आहेस. हे समजत नाहीये. आमच्यामध्ये मैत्री नसती तर मुद्दा वेगळा होता. पण, पूर्ण भारत पाहत आहे की, आमची चांगली मैत्री झालीय.'

देवोलिनाला पाठिंबा देण्यास आले हे कंटेस्टेंट्स

याप्रकरणी तेजस्वी प्रकाशने देवोलीना भट्टाचार्जीला पाठिंबा दिलाय. जेव्हा तेजस्वीला ही गोष्ट समजली तेव्हा ती अभिजीतवर खूप भडकते. ती अभिजीतला 'नीच' म्हणते. याशिवाय, करण कुंद्रा, शमिता शेट्टी, राखी सावंत, रितेश सह अन्य कंटेस्टेंट देवोलिनाला पाठिंबा देतात. आणि अभिजीतला खरे-खोटे ऐकवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT