वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: राजकारण हा माझा विषय नाही, मात्र समाजाची इच्छा आहे, म्हणून लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. उद्या गावागावातून येणाऱ्या अहवालाबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मनोज जरांगे- पाटील यांनी दिली. कोण काय म्हणत याबाबत सर्व चित्र शनिवारी (दि.३०) क्लियर होणार आहे. मराठ्याच्या उमेदवारीचा कोणाला फायदा होतो आणि कुणाला तोटा होतो, हे सगळं उद्या क्लियर होईल. मायबाप समाजाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले. ते अंतरवाली सराटीत आज (दि.२९) पत्रकारांशी संवाद साधत होते. Manoj Jarange
काही तरुण सोशल मीडियावर स्वयंघोषित उमेदवार असल्याचे निर्णय घेत आहेत. या त्या तरुणांच्या भावना आहे. त्यांना सरकारविषयी चीड आहे. सरकारने त्यांची फसवणूक केली म्हणून हे तरुण राजकारणात पाऊल टाकण्यासाठी असे करत असतात. मात्र समाज ठरवेल, तो अंतिम निर्णय राहील. गावागावातून आलेल्या अहवालानंतर अंतिम निर्णय होईल आणि तोच निर्णय सर्वांना लागू असेल.
काहीजण उमेदवाराच्या नावाखाली वर्गणी जमा करत असेल. तर, त्यांनी अजिबात असे कृती करणे योग्य नसल्याचाही म्हणत या निवडणुकीत एक रुपयाही लागणार नाही. त्यामुळे असले दुकाने कोणीही सुरू करू नये. त्यांनी असे केले असेल. तर त्यांनी ते परत करावे, नसता त्यांना मीडियासमोर वाजवल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दम ही वर्गणी जमा करणाऱ्या कार्यकर्त्यांना जरांगे यांनी दिला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीदरम्यान झालेल्या हाणामारीच्या घटनेवर बोलताना जरांगे म्हणाले की, तिथे काय झाले, हे मला माहित नाही. मी ते पाहिले ही नाही. मात्र, त्या दोघांना या ठिकाणी बोलून त्यांच्या समेट घालण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मोठे कुटुंब म्हटले, तर असे वाद होतातच असे ते म्हणाले.
काही जणांकडून आंदोलनात फूट पाडण्यासाठी असले कृत्य केले आहे का ? यावर बोलताना जरांगे म्हणाले की, समाजात आता फूट पडू शकत नाही. ७० टक्के समाज हा एकत्र आला आहे. त्यामुळे इतकी मोठी लाट निर्माण झाली आहे. काहींना झोपेत ही खासदारकी दिसू लागली आहे. त्यातील अनेकांना आपण खासदार झाल्यासारखे वाटत आहे. त्यांना मी उद्या प्लॅन दिला, तर कळेल निवडणुकीपेक्षा समाज महत्त्वाचा आहे, असा टोला त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या वादावरून वाद निर्माण करणाऱ्यांना लगावला आहे.
हेही वाचा