Bhool Bhulaiyaa 3  
Latest

प्रार्थना करून कार्तिक आर्यनचा शुभारंभ, Bhool Bhulaiyaa 3 शूटिंग सुरू

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचा हिट फ्रेंचाइजी 'भूल भुलैया' आता तिसरा पार्ट (भूल भुलैया 3) घेऊन येत आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा हसवण्यासाठी कार्यिक आर्यन तयार आहे. कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित सोबत मिळून दिग्दर्शक अनीस बज्मीसोबत काम करत आहे. (Bhool Bhulaiyaa 3 ) कार्तिक आर्यनने स्वत: पुष्टी केली आहे की, या चित्रपटाचे शूटिंग ९ मार्च पासून सुरु होत आहे. आपल्या घरामध्ये एका मंदिराच्या समोर प्रार्थना करत अशताना चित्रपटाची शुभ सुरुवातीसाठी आशीर्वाद मागताना आफला एक फोटो शेअर केला आहे. फोटोला इन्स्टाग्रामवर कॅप्शन देते Kartik Aaryan ने लिहिलं, 'आज माझ्या करियरची सर्वात मोठा चित्रपट सुरू होत आहे. #शुभारंभ #भूलभुलैया3.' (Bhool Bhulaiyaa 3 )

एका वेबसाईटनुसार, 'प्रोडक्शनमध्ये ८ दिवसांचे शूटिंग होणार आहे. ज्यामध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित सेटमध्ये सहभागी होण्यायाठी तयार आहे. तृप्ती डिमरी लवकरच या शूटिंगमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. 'भूल भुलैया २' वगळता आता विद्या बालन तिसऱ्या फ्रेंचायजीमध्ये परत आलीय.

अक्षय कुमारने पहिल्या भागात मुख्य भूमिका साकारली होती. दुसऱ्या भागातही तो दिसला नाही. आथा तिसऱ्या भागातही तो नसेल.

या दिवशी रिलीज होणार 'भूल भुलैया ३'?

फॅन्सना या चित्रपटाची उत्सुकता आहे. 'भूल भुलैया ३' दिवाळी २०२४ मध्ये रिलीज होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT