Latest

देशातील मूळ प्रश्‍नांना बगल देण्‍यासाठीच हिंदू-मुस्‍लिमांमध्‍ये दुही पसरविण्‍याचे काम : राहुल गांधींचा आरोप

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मी भारत जोडो यात्रेच्‍या माध्‍यमातून देशभरात शेकडो किलोमीटर चाललो. या काळात मला देशात कोठेही हिंसाचार आणि द्वेष पाहायला मिळाला नाही. मात्र देशातील मूळ प्रश्‍नांना बगल देण्‍यासाठी वृत्तवाहिन्‍यांतवर २४ तास हिंदू -मुस्‍लिमांमध्‍ये दुही पसरविण्‍याचे काम सुरु आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी यांनी आज ( दि. २४ ) केला. भारत जोडा यात्रेचे आज दिल्‍लीत आगमन झाले. यावेळी ते लालकिल्‍यावरुन जनतेला संबोधित करत होते. ( Bharat Jodo Yatra )

'माझी प्रतिमा खराब करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले'

या वेळी राहुल गांधी म्‍हणाले की, आज चीनने भारतातील जमिनीवर कब्‍जा केला आहे. चीनने भारताचे दोन हजार चौरस किमी जमीन बळकावली आहे. यावर पंतप्रधान म्‍हणतात, आमच्‍या भूमीवर कोणीही आलेला नाही. माझी प्रतिमा खराब कर्‍यासाठी या देशाने कोट्यवधी रुपये खर्च केली आहे, असा आरोपही त्‍यांनी या वेळी केला.

पंतप्रधान हे शेतकरी आणि तरुणांमध्ये भीती पसरवण्यात गुंतले आहेत. यात्रेत कुठेही हिंसाचाराची घटना घडली नाही. हिंदू धर्मात कुठे लिहिले आहे की, दुर्बलांना मारा? असा सवाल करत मी गीता, उपनिषद वाचले आहे, भाजप सरकारमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हे सरकार चोवीस तास भीती पसरवण्यात मग्न आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

Bharat Jodo Yatra : भारताला द्वेषातून नष्ट करण्याची गरज

भारताला द्वेषातून नष्ट करण्याची गरज आहे. भारताला जोडणे हे या यात्रेचे उद्दिष्ट आहे. हे मोदींचे सरकार नसून अदानी-अंबानींचे सरकार आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT