Latest

INDIA vs Bharat :’एनसीईआरटी’च्या पुस्तकात यापुढे ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर 'इंडिया' या नावाने ओळखले जाते आणि या नावाचा इतिहासही मोठा आहे. तथापि, प्राचीन काळापासून भारताला वेगवेगळ्या सात नावांनी ओळखले जात असे. गेले काही दिवस 'इंडिया' आणि 'भारत' हा विषय ऐरणीवर आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्याच कलमामध्ये 'इंडिया दॅट इज भारत,' असा उल्लेखही केला आहे. आता 'एनसीईआरटी'  समितीने    सर्व शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये 'इंडिया'च्या जागी 'भारत' करण्याची शिफारस केली आहे. (INDIA vs Bharat)

काय आहे 'इंडिया -भारत' वाद 

जी-20 परिषदेच्या कार्यक्रम (निमंत्रण) पत्रिकेत परंपरेप्रमाणे 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया'ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' नमूद करण्यात आले आणि नव्या वादाला तोंड फुटले. काँग्रेससह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सरकारवर टीका करताना 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' असे नमूद करायला हवे होते, असे स्पष्ट केले. विरोधकांनी सरकारविरोधात इंडिया आघाडी उघडल्याने पत्रिकेत हा बदल करण्यात आला, असेही काहींचे म्हणणे आहे. सरकारच्या या कृतीचे समर्थन करताना 'भारत' हेच देशाचे खरे नाव आहे. इंडिया हे परकीयांनी दिलेले नाव असून, वसाहतवादाच्या दास्याचे प्रतीक आहे, अशी भूमिका अनेकांनी मांडली. महत्त्वाचे म्हणजे अशीच भूमिका 1949 पासून वारंवार अनेकांकडून मांडली गेली आहे.भारतीय संविधानाच्या हिंदी प्रस्तावनेत हम भारत के लोग, असे नमूद आहे, तर इंग्रजी प्रस्तावनेत वुई द पीपल ऑफ इंडिया दॅट इज भारत, असे नमूद आहे.

'इंडिया' हे नाव कसे पडले?

ब्रिटिशांच्या काळात भारताला 'इंडिया' असे म्हटले जात असे. प्राचीन हडप्पा-मोहेंजोदडो संस्कृती ही पाश्चिमात्य देशांमध्ये इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणून ओळखली जात असे. सिंधू नदीला पाश्चिमात्य लोक इंडस रिव्हर म्हणायचे. त्यामुळे या संस्कृतीला त्यांनी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हटले. त्यावरून या देशाला लॅटिन भाषेमध्ये इंडे असे म्हटले जात असे. ब्रिटिशांकडून इंडे या नावानंतर बोलता बोलता 'इंडिया' असे संबोधले जायचे. त्यानंतर हेच नाव प्रचलित झाले.

आता इंग्रजीमध्ये असलेल्या 'इंडिया' या नावामध्ये बदल केला जाऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे. 'इंडिया' हे नाव भारताच्या राजपत्रातून कायमचे हद्दपार करून या देशाला फक्त 'भारत' या नावाने आंतरराष्ट्रीय ओळख मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी चर्चा होऊ लागली आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT