Latest

नासाचे पुढील लक्ष्य अंतराळातील कुबेराचे भांडार!

Arun Patil

वॉशिंग्टन : पृथ्वीवर राहण्यासाठी आपल्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. पण आपण हळूहळू ही संपदा जणू नष्ट करत चाललो आहोत. आता हे करताना आपण प्रगतिपथावर जरूर आहोत. पण जागतिक स्तरावर नजर टाकता असे दिसून येईल की, आजही अनेकांचे राहणीमान खूपच खालावलेल्या स्तरावर आहे. साहजिकच, पृथ्वीतलावर गरिबीच राहिली नाहीतर किती ठीक होईल, हा विचार उल्हासित करून जाणारा ठरतो. आता आश्चर्य वाटेल; पण शास्त्रज्ञांनी अंतराळातील अशी एक वस्तू शोधून काढली आहे, जे साक्षात 'कुबेराचे भांडार' आहे!

'डेली स्टार'ने दिलेल्या एका वृत्तानुसार, मंगळ व गुरू या दोन ग्रहांच्या मध्यात असा उल्कापिंड आहे, जो खूपच महागडा आहे. आता उल्कापिंडाचा एक तुकडादेखील बराच किमती असू शकतो कारण हा उल्कापिंड किमती खनिजांनी भरलेला आहे.

सदर उल्कापिंड लोखंड, निकेल व सोन्यासारख्या महागड्या धातूंचे आच्छादन आहे. पृथ्वीतलावरील हिशेबाप्रमाणे त्याची किंमत 10 हजार क्विन्टेलियन अमेरिकन डॉलर्स इतकी अगदी कल्पनेच्या पलीकडील असू शकते. लॅड बायबलच्या रिपोर्टनुसार, हा खजाना हाती लागला तर 8 बिलियन लोकसंख्या गृहीत धरली तरी जगातील प्रत्येकाकडे 1 ट्रिलियन पौंड म्हणजे 100 अब्जापेक्षा अधिक संपत्ती असू शकेल.

नासाची मोहीम ऑक्टोबरमध्ये

नासाने आता असे स्पेसक्राफ्ट तयार केले आहे, जे या किमती महागड्या वस्तूंबद्दल अधिक संशोधन करेल. 'नासा'च्या वेबसाईटनुसार, या उल्कापिंडाची रचना खूपच वेगळी असून, पृथ्वीपासून त्याचे अंतर 2.5 बिलियन मैल इतके आहे. तिथे पोहचण्यासाठीही 6 वर्षांचा कालावधी लागू शकतो. 'नासा' यासाठी दि. 5 ऑक्टोबर रोजी कॅनेडियन स्पेस सेंटरमधून आपल्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेला सुरुवात करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT