बंगळूर : म्हैसूर नगर विकास प्राधिकरण घोटाळ्याबाबत लोकायुक्त अधिकार्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या बुधवारी सकाळी 10 वाजता हुबळी येथे लोकायुक्तांच्या सुनावणीला उपस्थित राहणार आहेत.
म्हैसूर लोकायुक्त अधिकार्यांनी मुडा घोटाळ्यासंदर्भात आरोपी क्रमांक एक असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना नोटीस बजावली आहे. त्यांना 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुनावणीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी म्हैसूर लोकायुक्त कार्यालयात 6 रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे कळवण्यात आले आहे. सिद्धरामय्या यांच्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच चौकशीची नोटीस बजावण्यात आली आहे.