बेळगाव

महिलेला लुटणार्‍या सांगलीतील तोतया पोलिसाला अटक

अनुराधा कोरवी

संकेश्वर ः पोलिस बनून महिलेचे पाच तोळे दागिने घेऊन पसार झालेल्या सांगली येथील तोतया पोलिसाला संकेश्वर पोलिसांनी अटक केली. महम्मद युसूफ इराणी (वय 35, रा. सांगली) असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून दागिन्यांसह दुचाकी जप्त केली.

महामार्गावर बंदोबस्तावर असलेल्या संकेश्वर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महंमदला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता संकेश्वर-अंकले रस्त्यावरून निघालेल्या महिलेला पोलिस असल्याचे सांगून सोने काढून ठेवण्याच्या बहाण्याने ते पळवून नेल्याचे उघडकीस आले. असा प्रकार त्याने गडहिंग्लज तालुक्यातही अनेक ठिकाणी केल्याचेही समोर आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT