बेळगाव

बेळगाव : हिप्परगी धरणातून दीड लाख क्युसेक विसर्ग सुरू

दिनेश चोरगे

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा नदीला पूर आला आहे. दोन दिवसात जवळपास दहा फुटाने पाणी पातळी वाढली आहे. जिल्ह्यातील धरणे आता 80 टक्क्यापेक्षा अधिक भरली असून, हिप्परगी धरणातून 1 लाख 48 हजार क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला असून, मलप्रभा, घटप्रभा धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

मलप्रभा धरणात 29.346 टीएमसी पाणीसाठा असून, याची क्षमता 37.731 टीएमसी आहे. या धरणात 20 हजार 266 क्युसेक पाण्याची आवक होत असून, 3 हजार 394 क्युसेक विसर्ग ठेवण्यात आला आहे. विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

घटप्रभा धरणात (राजा लखममौडा जलाशय) 47.633 टीएमसी पाणीसाठा असून, याची क्षमता 51 टीएमसी आहे. या धरणात 29 हजार 2 क्युसेक पाण्याची आवक होत असून, विसर्ग 11 हजार 902 क्युसेक सुरू आहे.
बेळगाव जिल्ह्यावर परिणाम करणारी महाराष्ट्रातील धरणेही आता 80 टक्क्याहून अधिक भरली आहेत. कोयना धरण 83, वारणा 92 , दुधगंगा 88 आणि राधानगरी धरण 99 टक्के भरले आहे. त्यामुळे दूधगंगा आणि वेदगंगा यासह कृष्णा नदी काठावर दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT