बेळगाव

बेळगाव : हिंदू देवतांचा अवमान करणाऱ्याला अटक

अनुराधा कोरवी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : हिंदू देवतांचे अश्लील फोटो लावून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करण्याबरोबर ते फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आले होते. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी तपास करून शहापूर पोलिसांकडून एकाला अटक करण्यात आली आहे. इम्रान पाशा अमिर जान (१९), रा. चौरड्डी पाळ्या, ता. चिंतामणी, जि. चिक्कबळापूर असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापुरुषांबरोबर देवदेवतांचे अश्लील फोटो लावून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची ऑनलाईन विक्री करण्यात आली होती. तसेच सदर फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आले आहे. यावरुन शहापूर पोलिस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन सदर कारवाई करण्यात आली आहे याप्रकरणी सीईन पोलिस निरीक्षक व शहापूर पोलिस निरीक्षक सुनीलकुमार एच यांच्या मार्गदर्शनाखाली सद कारवाई करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT