बेळगाव

बेळगाव विधानसभा निवडणूक : नवे आरक्षण, नवा गोंधळ

अनुराधा कोरवी

नुकतेच राज्यसरकारने न आरक्षण धोरण स्वीकारले आहे. सत्ताधारी भाजपने लिंगायत आणि लिंग समाजाला कुरवाळण्याचा प्रयत्न केला आहे.

मुस्लिम समाजाला असलेले ४ टक्के रद्द करून ते लिंग लीग या समाजांना प्रत्येकी २ प्रमाणे बद्दल करण्यात आले आहे तर मुस्लीम समाजाला आर्थिकदृष्ट्या मानसून आरक्षण देण्यात आले आहे. मात्र याला विरोध वाढत आहे. पक्षाला फायदा होऊ शकतो हे नव्या आरक्षण धोरणाचा कोणत्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

सत्तेवर आल्यास अवैज्ञानिक आरक्षण रद्द

सरकारने जाहीर केलेल्या आरक्षणावर काँग्रेसने आक्षेप घेतला असून, सरकारकडून जनतेची फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप करत राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्या जाहीर करण्यात आलेले अवैज्ञानिक आरक्षण करण्यात येईल असे काँग्रेस पक्षाध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिध्दरामया राज्य प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांनी घेतलेल्या परित्रकार परिषदेत सांगितले.
शिवकुमार म्हणाले, राज्यातील अल्पसंख्यांकाना देण्यात आलेले ४ टक्के आरक्षण काढून टाकून पंचाली लिंगायत व वक्कलिंगांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरक्षण काही मिलाले नाही. लिंगायत, वक्कलिंगांकडून भिक्षा मागितली जात नाही.

पण हे सरकार एकट्याचा हक्क काडून घेऊन दुसयाला देत आहे. या माध्यमातून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसंख्येच्या आधारावर प्रत्येकाला हक्क मिळावा. महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेशमध्ये आरक्षणात न्यायालयाने कार निर्णय दिला दोयासमोर आहे. काय विभाग न पाहता काम करत आहे. घटनेने दिलेले अल्पसंख्याकांचे आरक्षण काडून घेऊन व्देषाचे राजकरण का केले जात आहे, असा सवालही शिवकुमार यांनी केला.

जाती-धर्माच्या नावावर समाजाचे विभाजन केले जात आहे, असा आरोप सिध्दरामय्या यांनी केला. कोणत्या आधारावर अल्पसंख्यांकाचे आरक्षण रह करून पंचमसाली व कलिंगांना वाटण्यात आले? कोणत्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला? २ ची आरक्षण रद्द करून कोणत्या आधारावर त्यांच ईडब्ल्यूएसमध्ये समावेश करण्यात आला? असेही त्यांनी उपस्थित केले.

बंजारांच्या हिंसेमागे काँग्रेसची चाल : बोम्मई

राज्यात सुरू असलेल्या बंजारा समाज्याच्या हिंसक आंदोलनामागे काँग्रेसची चाल असल्याचा आरोप मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला आहे. बंजारा सदाशिव आयोगाच्या समाजाचा अहवालानुसार अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा अशी बंजारा समाजाची मागणी आहे. लगेच माजी मुख्यमंत्री श्री. एस. येडियुरप्पा यांच्या शिकारपूर येथील निवासस्थानावर दगडफेक करण्याचा प्रकारही काँग्रेसची पूर्वनियोजीत खेळ होती. या घटनेच्या आदल्या दिवशी काँग्रेस नेत्यांनी एक बैठक घेतली होती. त्या नेत्यांनीच परावर हल्ला केला याबबातचे पुरावेही आहेत. कॉग्रेसचे नेते ठरवूनच असले भ्याड प्रकार करत आहेत आणि निष्प बंजारा समाजाच्या भावना भडकावत आहेत.

हा भाजपचा अंतर्गत वाद : डीकेएस

माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्या घरावरील हल्ला हा भाजपचा अंतर्गत मामला आहे. येडियुराप्पा यांना राडघराण्यातून संपवणे हा हेतू असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी सांगितले ते म्हणाले, मुख्यमंत्री कोम्प्रकाराला कारणीभूत आहेत. जेव्हा एखाद्या मागणीवर अन्याय होतो तेंव्हा लोक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करतात. सध्या येडियुराच्या कोणत्याही पदावर नाहीत, त्यामुळे बंजारा समाजाने त्यांच्या परावर दगडफेक करण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपच्या अंतर्गत वादामुळेच डोका आहे. (रणांगण)

SCROLL FOR NEXT