बेळगाव : वंदे भारत'साठी हवेत आणखी थांबे file photo
बेळगाव

बेळगाव : वंदे भारत'साठी हवेत आणखी थांबे

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पुणे-हुबळी मार्गावर अलीकडेच सुरु झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसबाबत बेळगाव परिसरातील प्रवासी फारसे समाधानी नसल्याचे दिसून येत आहे. या एक्स्प्रेसला बेळगावपासून मिरजेपर्यंतच्या कर्नाटक हद्दीत एकही थांबा नसल्याचा हा परिणाम आहे. अधिकाधिक प्रवाशांना या एक्स्प्रेसचा लाभ व्हावा, यासाठी अतिरिक्त थांब्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी चिकोडी व गोकाकमधील प्रवाशांनी उचलून धरली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ सप्टेंबर रोजी पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ही एक्स्प्रेस दोन्ही बाजूंनी आठवड्यातून तीनवेळा धावत असून अन्य तीन दिवस कोल्हापूर-पुणे मार्गावर सुरू आहे. पुणे ते कोल्हापूर अंतर ३२६ किमी असून एकूण पाच थांबे आहेत. तर पुणे-हुबळी अंतर ५५८ किमी असूनही कर्नाटकात केवळ धारवाड व बेळगाव असे दोनच थांबे आहेत. विस्ताराने मोठ्या असलेल्या बेळगावात केवळ एकच थांबा असल्याने प्रवासी व व्यावसायिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

हुबळी-पुणे वंदे भारत धारवाड, बेळगाव, मिरज, सांगली, सातारा या स्थानकांवर थांबते. हुबळी सोडल्यानंतर पहिला थांबा धारवाड (२० किमी) आहे. त्यानंतर धारवाड-बेळगाव (१२२ किमी), बेळगाव-मिरज (१५७ किमी), मिरज-सांगली (७ किमी), सांगली सातारा (१२७ किमी) व सातारा-पुणे (१४५ किमी) असा या एक्स्प्रेसचा प्रवास आहे. इतर तीन दिवस ही रेल्वे कोल्हापूर-

66 जिल्ह्यातील प्रवाशांची मागणी रास्त आहे. वंदे भारतचा लाभ अधिकाधिक प्रवाशांना व्हावा यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. बेळगाव ते मिरजपर्यंत आणखी थांबे सुरु करावे, यासाठी मी पाठपुरावा करत आहे. अधिक थांब्यांसाठी रेल्वेमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. पुणे या ३२६ किमी मार्गावर दरम्यान धावते. या मार्गावर मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, सातारा असे चार थांबे आहेत.

बेळगाव स्थानकामुळे बेळगाव, बैलहोंगल, कित्तूर व खानापुरातील प्रवाशांची सोय झाली आहे. पण, उर्वरित जिल्ह्यातील प्रवासी या सेवेपासून वंचितच आहेत. त्यामुळे, ही एक्स्प्रेस घटप्रभा स्थानकावर थांबल्यास गोकाक, मुडलगी आणि हुक्केरी तालुक्यातील प्रवाशांची सोय होईल. तर रायबाग किंवा कुडचीत थांबल्यास रायबाग, चिकोडी व अथणीतील प्रवाशांची गैरसोय दूर होईल. त्यामुळे, घटप्रभा व रायबाग किंवा कुडचीत थांबा सुरु करावा, अशी मागणी होत आहे. ही मागणी स्थानिक खासदारांसह राज्यसभा सदस्यांकडे करण्यात आली आहे. -

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT