बेळगाव

बेळगाव : मुख्यमंत्री शिंदेंनी सीमाप्रश्नी मोदी यांच्याशी चर्चा करावी : संजय राऊत

मोहन कारंडे

बेळगाव/नाशिक; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव सीमाभागातील मराठी जनतेवर कर्नाटकाकडून अत्याचार होत आहेत. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्रात भाजपचे मुख्यमंत्री आहेत. केंद्र आणि कर्नाटकातही भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला.

नाशिक येथे शनिवारी (दि. 9) पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शिवसेनेचे हायकमांड मातोश्री आहे. मंत्रिमंडळ ठरवण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री कधीही दिल्लीला गेला नाही. त्यामुळे सध्याचे सरकार भाजपचे असून त्यांचे मुखवटे गळून पडत आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेतून बाहेर पडल्यानंतर सीमाभागात मराठी जनतेवर अत्याचारात वाढ झाली आहे. आता केंद्र आणि कर्नाटकातही भाजपचेच सरकार आहे. सीमावाद सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे तिथे निकाल लागेपर्यंत सीमावादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करावी. मराठी भाषिकांची भूमिका त्यांनी मांडावी. सीमाभागातील शिष्टमंडळ आपल्याला नुकतेच भेटून गेले आहे. तेथील परिस्थिती गंभीर झाली आहे, याची दखल मुख्यमंत्री शिंदे यांनी घेऊन दोन्ही भाजप सरकारकडे मराठी भाषिकांची भूमिका मांडावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

SCROLL FOR NEXT