बेळगाव

बेळगाव : मटका घेणार्‍या दोघांसह नऊ जणांवर गुन्हा; 26 हजार जप्त

अनुराधा कोरवी

बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा होसूर, बसवाण गल्ली येथे मटका घेणार्‍या दोघांसह तेथे जाऊन खेळणारे सातजण अशा नऊ जणांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून 26 हजार 450 रूपये जप्त केले. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शहापूर पोलिसांनी ही कारवाई केली.

बसवाण गल्लीतील हरिजन वाडा येथे मटका घेत असल्याची माहिती शहापूरचे निरीक्षक सुनीलकुमार एच. यांना मिळाली. कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रविंद्र गडादी, मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सहकार्‍यांसह जाऊन येथे छापा टाकला असता येथे आकाश मॅगीनमनी विश्वनाथ मॅगीनमनी (दोघेही रा. हरिजनवाडा) हे दोघेजण मटका घेत असल्याचे आढळून आले.

शिवाय येथे मटका खेळण्यासाठीही सातजण आले होते. घेणार्‍यांसह खेळणार्‍यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मटका घेणारे दोघेजण ही रक्कम प्रमोद धामणेकर (एसपीएम रोड) याच्याकडे देत असल्याचे सांगितल्याने धामणेकर याच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे निरीक्षक सुनीलकुमार यांनी सांगितले. शहापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT