बेळगाव

बेळगाव : पोलिस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत चार वर्षांत ५४९ जणांनी गमावले प्राण

अनुराधा कोरवी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : बेळगावच्या पोलिस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत गेल्या चार वर्षांत तब्बल ५४९ जणांना अपघातात प्राण गमवावा लागला आहे. दोन हजारहून अधिक अपघातांमध्ये सुमारे दीड हजार जणांना अपंगत्व आले आहे. सध्या सुरु असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त घेतलेल्या माहितीत ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

बेळगाव पोलिस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत बेळगाव तालुक्यातील सर्व म्हणजे ११० लहान मोठ्या गावांचा समावेश आहे. सोळा पोलिस ठाण्यांमध्ये गेल्या चार वर्षात नोंदवलेल्या आकडेवारीनुसार चार वर्षांत २ हजार २० अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये ५४९ जणांचे प्राण गेले असून, १ हजार ४७९ जण जखमी झाले आहेत. यातील बहुतांश लोकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

बेळगाव परिसरातील अपघात हे इतर शहराच्या तुलनेत खूपच अधिक आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, रस्त्यावर वाढलेली भरमसाठ वाहनांची संख्या, कालबाह्य वाहने चालवणे आदी अपघातांची कारणे असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

इतर शहरांच्या तुलनेत बेळगाव शहर परिसरात सर्वाधिक हेल्मेटची सक्ती होत असताना अपघात वाढले आहेत. विशेष म्हणजे या अपघातातील मृतांची संख्या ही जवळपास ८० टक्के युवकांची आहे. यामध्ये दुचाकीस्वार अधिक आहेत. बेळगाव तालुक्यातील वाहनांचे प्रमाण पाहिल्यास जवळपास चार लोकांमागे एक इतके प्रमाण वाढले आहे. रस्त्यांची रुंदी मात्र तीच आहे. अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर आता गरजेचे बनले आहे.

बेळगाव परिसरातील अपघात

सन   अपघात   मृत्यू   जखमी

२०१९         ५८४            १५४            ४३०

२०२०         ४२७           ११६              ३११

२०२१         ४३४           ११५               ३१९

२०२२        ५७५           १६४               ४११

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT