बेळगाव

बेळगाव : दर्शनच्या उपचारासाठी सरसावले डॉक्टर

मोहन कारंडे

खानापूर; पुढारी वृत्तसेवा : अपघातानंतर ब्रेन हॅमरेजमुळे गेल्या पाच महिन्यांपासून अंथरूणाला खिळून असलेल्या दर्शन दिलीप पाटील (वय 21) रा. लोकोळी (ता. खानापूर) या युवकाच्या उपचारासाठी बेळगाव येथील यश हॉस्पिटलमधील डॉक्टर पुढे सरसावले आहेत. शनिवारी त्याला लोकोळी येथून रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गुजरातमधील अहमदाबाद येथे एका बांधकाम कंपनीत दर्शन इलेक्ट्रिशियन म्हणून कामाला होता. काम संपवून सायकलवरून खोलीवर जाताना भरधाव कारने त्याच्या सायकलला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान ब्रेन हॅमरेज झाल्याने दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत चालली होती. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवल्याने दोन बहिणी व आईचा सांभाळ करण्याची जबाबदारी असलेला कर्ता मुलगाच अंथरूणाला खिळून राहिल्याने त्याच्या उपचाराचा प्रश्न गंभीर बनला होता. त्याच्या उपचारासाठी दानशूर व्यक्ती आणि संवेदनशील मनाच्या डॉक्टरांनी पुढे येण्याचे आवाहन दै. 'पुढारी'ने सहा दिवसांपूर्वी केले होते. त्याला यश हॉस्पिटलचे डॉ. एस. के. पाटील यांनी प्रतिसाद देत दर्शनच्या उपचाराची जबाबदारी उचलली आहे.

शनिवारी उपचाराच्या पहिल्याच दिवशी दर्शनच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. याकामी फेसबुक फ्रेंड सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर व त्यांच्या सहकार्‍यांचे मोलाचे ठरले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT