बेळगाव

बेळगाव : डिसेंबरमध्ये बेळगावात विधिमंडळ अधिवेशन

मोहन कारंडे

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बेळगाववर दावा करण्यासाठी सरकारने बांधलेल्या हलगा येथील सुवर्णसौधमध्ये यंदाही हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. याबाबत विधानसभा सभापती विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी माहिती दिली आहे.

दरवर्षी विधिमंडळाचे अधिवेशन बेळगावात घेण्यात येण्याचे सरकारचे नियोजन आहे. उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी या अधिवेशनाचे प्रामुख्याने आयोजन करण्यात येते. पण, प्रत्यक्षात उत्तर कर्नाटकातील समस्यांवर चर्चा झालेली नाही. गतवर्षी डिसेंबर महिन्यातच बेळगावात अधिवेशन घेतले होते. दहा दिवसांच्या विधिमंडळ अधिवेशनात 52 तास 14 मिनिटे चर्चा झाली होती. त्यामध्ये 14 विधेयके संमत करण्यात आली होती. बंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना सभापती कागेरी म्हणाले, बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित केलेली नाही. पण मी बेळगावला लवकरच भेट देणार आहे. त्यानंतर अधिवेशनाची तारीख जाहीर करू. डिसेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात त्या अधिवेशन भरण्याची शक्यता आहे.

…तर समितीचा महामेळावा

कर्नाटक सरकार सर्वोच्च न्यायालयात बेळगाववर दावा सांगण्यासाठी हलगा येथे विधिमंडळ अधिवेशन घेत असते. त्याला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळाव्याचे आयोजन करत आली आहे. जर यंदा अधिवेशन झाले तर म. ए. समितीचा महामेळावाही होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT