बेळगाव

बेळगाव : कॅन्टोन्मेंट निवडणुकीपाठोपाठ कर्मचारी भरतीलाही स्थगिती

दिनेश चोरगे

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक 30 एप्रिलला होणार होती ती सध्या थांबवण्यात आली आहे. त्या पाठोपाठ जानेवारी महिन्यात राबवण्यात आलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या भरती प्रक्रियेलाही स्थगिती देण्यात आली आहे. सध्या कॅन्टोन्मेंट बोर्डची आर्थिक परिस्थिती नाजूक असून विकास कामे राबविण्यासाठी निधी उपलब्ध नाही. सध्या कर्मचारी कार्यरत आहेत त्यांचे पगार देखील वेळेत होत नाही. त्यामुळे पुन्हा भरती पुन्हा कर्मचारी भरती केल्यास कॅन्टोन्मेंट बोर्ड च्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडणार आहे. असे कारण देत जानेवारी महिन्यात राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. अशा आशयाचे पत्र संरक्षण खात्याकडून कॅन्टोन्मेंट बोर्ड ला प्राप्त झाले आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डने विविध रिक्त पदे भरण्याचा सपाटा चालविला होता. या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार संरक्षण खात्याकडे सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनी केली होती. या भरती प्रकरणावरून खासदार इराणा कडाडी
कॅन्टोन्मेंट बैठकीत प्रश्न उपस्थित करून अहवाल मागवला होता. याच दरम्यान कॅन्टोन्मेंटकडे निधी नसल्याचे सांगत सर्व भरती प्रक्रिया थांबविण्यात यावी अशा सूचनेचे पत्र संरक्षण खात्याने कॅन्टोन्मेंट बोर्डला बजावले आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या कर्मचारी भरती प्रक्रियेला तूर्तास ब्रेक लागला आहे.

कॅन्टोन्मेंट कार्यालयातील रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. काही पदे भरून घेण्यात आली आहेत. आणखी काही रिक्त पदे भरण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने अर्ज मागविले आहेत. मात्र कॅन्टोन्मेंट भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याचप्रमाणे लाखो रुपयांची रक्कम भरतीसाठी घेतली जात असल्याची टीका लेखी तक्रारीद्वारे करण्यात आली होती. याबाबतच्या तक्रारी संरक्षण खात्याकडे करण्यात आल्या होत्या. याची दखल घेत संरक्षण खात्याने भरती प्रक्रिया थांबविण्याचा आदेश बजावला आहे. विकासकामे राबविण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने विकासकामे राबविणे अशक्य बनले आहे. परिणामी विविध समस्या भेडसावू लागल्या आहेत.

देशातील 54 कॅन्टोन्मेंटची आर्थिक परिस्थिती बिकट

देशातील 54 कॅन्टोन्मेंटची आर्थिक स्थिती खूपच बिकट बनली असून विकासकामे राबविणे अशक्य बनले आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया थांबविण्यात यावी अशी सूचना संरक्षण खात्याने कॅन्टोन्मेंट बोर्डला केली आहे. आर्थिक स्थिती बिकट बनल्याने येथील कर्मचान्यांचे चैतन देताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सध्या ही प्रक्रिया राबवू नये, असे पत्र कॅन्टोन्मेंट बोर्डला पाठविण्यात आले आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT