बेळगाव

बेळगाव : कर्लेजवळ 80 हजारांचे मद्य जप्त, अल्पवयीनसह तिघांवर गुन्हा

अनुराधा कोरवी

बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा गोवा येथून स्वस्तातून मद्य आणून ते बेळगाव तालुक्यातील कर्ले, किणयेसह अन्य गावांमध्ये विकणार्‍या तिघांना अटक केली. एका अल्पवयीनासह तिघांचा यामध्ये समावेश असून त्यांच्याकडून 80 हजारांचे मद्य जप्त केले. शिवाय विक्रीसाठी वापरलेले वाहनही ताब्यात घेतले.

लक्ष्मण ऊर्फ बाळ्या सातेरी पाटील त्याचा मोठा मुलगा साहील लक्ष्मण पाटील (वय 19, दोघेही रा. बहाद्दरवाडी) व आणखी एका अल्पवयीन युवकाचा समावेश आहे. लक्ष्मण ऊर्फ बाळ्या हा गोव्याहून मद्य आणून त्याच्या मुलामार्फत तालुक्यात विकत असल्याची माहिती सीसीबीचे निरीक्षक निंगनगौडा पाटील यांना मिळाली.

कारच्या डिक्कीमध्ये ठेवून ते कर्ले येथे मद्य विकत असल्याचे समजल्यानंतर तेथे जाऊन छापा टाकला असता मद्य आढळून आले. 108 लिटर मद्य असलेल्या 189 बाटल्या, यासाठी वापरलेली कार व एक मोपेड जप्त केले.तिघांवरही गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत एच. एस. निसन्नवर, एस. बी. पाटील. एम. एम. वडेयर, एस. एम. बजंत्री, वाय. डी. नदाफ यांनी भाग घेतला.

SCROLL FOR NEXT