बेळगाव

बेळगाव : ऊस दरापेक्षा खुशालीचा दर भडकला

दिनेश चोरगे

अथणी; पुढारी वृत्तसेवा : यावर्षीचा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोरात सुरू असून, ऊसदरापेक्षा खुशालीचा दर भडकला आहे. ऊसतोड मुजरांवर अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहिलेले नाही. खुशाली जिकडे जास्त तिकडचा ऊस तोडण्यास प्राधान्य दिले जात असून मुकादम अधिकारी बनल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुकादमाचे नाही ऐकले तर टोळी दुसऱ्या कारखान्याला जाण्याची आहे.

भीती असल्यामुळे अधिकाऱ्यांना शांत बसण्याशिवाय पर्याय नसल्याची स्थिती आहे. अनेक कारखान्यातील अधिकारी ऊसतोड चाललेल्या ठिकाणी येतात. परंतु ऊस कोणत्या जातीचा आहे, याची वाहनात बसूनच पाहणी केली जाते. उसाच्या फडात जाऊन ऊस कोवळा की चांगला आहे, याची पाहणी केली जात नाही. मुकादम सांगण्यावर विश्वास ठेवून ऊस तोड केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही. कारखाना व्यवस्थापकाने वेळीच लक्ष घालून पाहणी करून कारवाई करण्याची मागणी शेतकच्यांवर करण्यात येत आहे.

नोंदीप्रमाणे ऊसतोड नसल्याने नाराजी

सध्या ऊसतोड हंगाम जोरात सुरुवात असून शेतकरी आपला ऊस लवकर जाण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सध्या उसाला २७५० रुपये प्रतिटन दर असून एक टनाचे बिल मुकादम व चालकाला देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सर्व शेतकऱ्यांनी उसाची नोंद कारखान्यांना केली आहे. त्यामुळे नोंदीप्रमाणे ऊसतोड करण्याचा कारखाना व्यवस्थापकांचा आदेश असला तरी कोणत्याही उसाची तोड दीप्रमाणे केली जात नाही. अधिकाऱ्यांचे नियंत्रण ऊसतोड मजुरांवर नसल्याने मुकादम सांगेल तो ऊस तोडण्याची वेळी अधिकाऱ्यांवर आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कोवळा ऊस तोडल्याने कारखान्याचे नुकसान होत आहे. परंतु याकडे अधिकाऱ्यांचे गांभीर्याने लक्ष नाही. रिकव्हरी कमी होऊन नुकसान होत आहे.

SCROLL FOR NEXT