बेळगाव

बेळगाव : अतिवाड, अगसगे येथे शेतवडीतील बटाट्याची चोरी

अनुराधा कोरवी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : सध्या तालुक्यात बटाटा काढणीचा हंगाम सुरु आहे. शेतकरी बटाटा काढणीबरोबरच बाजार पेठेत विक्रीसाठी ही लगबग सुरु आहे. अशात शेतवडीत पोती भरुन ठेवण्यात आलेल्या बटाट्याची पोती चोरट्यांनी लंपास केल्याची घटना अतिवाड व अगसगे येथे घडली. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

अतिवाड येथील आप्पाजी पाटील व गुंडू पाटील यांच्या शेतामध्ये चोरीची घटना घडली आहे. आप्पजी पाटील यांनी बटाटे काढून पोती भरून शेतामध्ये ठेवली होती. रस्त्याकडेलाच शेती असल्याने वाहतुकीला सोयीस्कर होईल यादृष्टीने पोती ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी 21 पोत्यांपैकी तीन पोती बटाटे लंपास केली.

तसेच गुंडू पाटील यांनी बटाटे काढून एकत्र ठेवले होते. झाकून ठेवण्यात आलेल्या ढिगातील बटाट्याची चोरी करण्यात आली आहे. तसेच अगसगे येथील शिवाजी बच्चनट्टी यांच्या शेताीतील दोन पोती बटाट्यांची चोरी करण्यात आली आहे. यांमुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

SCROLL FOR NEXT